तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आह!”
Cross references
मी बूजीचा मुलगा याजक यहेज्केल. मी परागंदा झालो होतो. मी खास्द्यांच्या देशात खबार कालव्याच्या काठी असताना आकाश दुभंगले व मला देवाचा दृष्टान्त झाला. 30व्या वर्षीच्याचौथ्या महिन्याच्या (जूनच्या) पाचव्या दिवसाची ही घटना आहे.यहोयाखीन राजाच्या परागंदा होण्याच्या काळातील 5 व्या वर्षी, महिन्याच्या 5 व्या दिवशी, यजेज्केलला परमेश्वराचा शब्द प्राप्त झाला.
माझ्या रात्रीच्या दृष्टान्तात मला मनुष्यप्राण्याच्या आकृतीसारखे काहीतरी दिसले. तो ढगांवरून येत होता. तो प्राचीन राजाकडे आला. त्याला राजासमोर आणण्यात आले.
येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला, तेव्हा आकाश उघडले, आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला.
येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही.”
कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे. आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
“मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल.
येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हांला सांगतो: ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल.”
येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला.
तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता, तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.” 52
याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही. परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे.
आणि आपल्यासामोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काही तरी जमिनीवर येत आहे, असे त्याला दिसू लागले.
असे तीन वेळा घडले. मग त्या सगळ्या गोष्टी वर स्वर्गामध्ये पुन्हा घेतल्या गेल्या.
तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलतानाऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, “इकडे ये, आणिमी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.”
मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट,भूकंप व गारांचे वादळ झाले.
नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे‘नाव विश्वासू आणि खरा’ असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो.