Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 7:15 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 7:15 · मराठी बायबल

मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले.

Cross references

उत्पत्ति 46:3

देव म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे; पाहा, मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको

उत्पत्ति 49:33

आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर इस्राएल आपले पाय पलंगावर घेऊन झोपला व मरण पावला.

निर्गम 1:6

काही काळानंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व लोक मरण पावले.

गणना 20:15

खूप खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले.

अनुवाद 10:22

तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमच्या परमेश्वराच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पट, आकाशातील ताऱ्यांइतके आहात.

अनुवाद 26:5

तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, ‘आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले.

यहोशवा 24:4

मग याकोब आणि एसाव हे दोन पुत्र इसहाकाला दिले. सेईर डोंगरा भोवतालची जमीन मी एसावला दिली. याकोब आणि त्याची मुलेबाळे येथे राहिली नाहीत. ती मंडळी मिसर देशात गेली.

इब्री लोकांस 11:21

विश्वासाने याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.

Interlinear

Choose Theme