Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 6:13 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 6:13 · मराठी बायबल

आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले, ते म्हणाले, “हा मनुष्य (स्तेफन) पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो. आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो.

Cross references

स्तोत्रसंहिता 27:12

मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले. मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.

स्तोत्रसंहिता 35:11

साक्षिदारांचा समूह मला दु:ख द्यायचे कारस्थान करीत आहे. ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही.

स्तोत्रसंहिता 56:5

माझे शत्रू माझ्या शब्दांचा विपर्यास करतात. ते नेहमी माझ्या विरुध्द दुष्ट कारवाया करतात.

मत्तय 24:15

तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.

प्रेषितांचीं कृत्यें 6:11

तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की, “आम्ही स्तेफनाला मोशे व देव यांच्यावरुध्द दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले.”

प्रेषितांचीं कृत्यें 7:58

त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते.

प्रेषितांचीं कृत्यें 21:28

ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे, आणि आता त्याने विदेशी लोकांना देखील मंदिरात आणले आहे, आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 25:8

पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या, मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही.”

इब्री लोकांस 7:12

कारण जेव्हा याजकपणात बदल होतो तेव्हा नियमशास्त्रसुद्धा बदलणे अपरिहार्य होते.

Interlinear

Choose Theme