Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 28:6 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 28:6 · मराठी बायबल

त्या बेटावरील लोकांना पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरुन पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले, आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.

Cross references

मत्तय 21:9

काही लोक येशूच्या पुढे चालू लागले. काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करु लागले,“होसान्ना,दाविदाच्या पुत्राला प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो, स्वर्गीय देवाला होसान्ना!” स्रोत 118:26

मत्तय 27:22

पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”

प्रेषितांचीं कृत्यें 12:22

लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला.

प्रेषितांचीं कृत्यें 14:11

पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले. ते म्हणाल, “देव माणसांसारखे झाले आहेत! ते आमच्याकडे खाली आले आहेत!”

Interlinear

Choose Theme