Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 27:13 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 27:13 · मराठी बायबल

जेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारु हाकारीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांना वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हांला पाहिजे होते. व तसेच ते वाहत आहे.

Cross references

ईयोब 37:17

परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत. तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो, तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.

स्तोत्रसंहिता 78:26

देवाने पूर्वेकडचा घोंगावणारा वारा पाठवला आणि त्यांच्यावर लावे पक्षी पावसाप्रमाणे कोसळले देवाने दक्षिणेकडून वारा वाहायला लावला आणि निळे आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते.

गीतरत्न 4:16

उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे आणि तिथली गोड फळे चाखू दे.

लूक 12:55

जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता “उकाडा होईल’ आणि तसे घडते.

Interlinear

Choose Theme