Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 22:23 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 22:23 · मराठी बायबल

ते मोठमोठ्याने ओरडत होते. आपल्या अंगावरील कपडे काढून फेकीत होते, आणि हवेत धूळ उधळीत होते. हे पाहून सरदाराने पौलाला किल्ल्यात नेण्याची आज्ञा केली.

Cross references

2 शमुवेल 16:13

दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता.

उपदेशक 10:3

मूर्ख त्याचा मूर्खपणा रस्त्यावरून जात असतानासुध्दा दाखवतो. तेव्हा तो मूर्ख आहे हे सर्वांना दिसते.

प्रेषितांचीं कृत्यें 7:53

तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”

प्रेषितांचीं कृत्यें 7:58

त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते.

प्रेषितांचीं कृत्यें 26:11

अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली. आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरिता इतर शहरांमध्ये देखील जात असे.

Interlinear

Choose Theme