Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 21:33 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 21:33 · मराठी बायबल

मग सरदार पौलाकडे आला व त्याला अटक केली व त्याला साखळदंडानी बांधण्याचा आदेश दिला. मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.

Cross references

शास्ते 15:13

यहूदी म्हणाले, “मान्य आहे, आम्ही फक्त तुला बांधून पलिष्ट्यांच्या हवाली करतो तुझ्या जिवाला धक्कालावणार नाही.” त्याप्रमाणे त्यांनी शमशोनला दोन नवीन दोरखंडांनी बांधून गुहेतून वर आणले.

शास्ते 16:8

तेव्हा पलिष्टी अधिकाऱ्यांनी दलीलाला सात नव्या प्रत्यंचा आणून दिल्या. त्या अजून पुरत्या वाळल्या देखील नव्हत्या. दलीलाने त्यांनी शमशोनला जखडून टाकले.

शास्ते 16:12

तेव्हा दलीलाने नवेकोरे दोरखंड आणून त्याला बांधले. दुसऱ्या खोलीत काही जण लपलेले होतेच. दलीला मोठ्यानेे म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला पकडायला आले आहेत!” पण याही वेळी शमशोनने ते दोरखंड सुतळीसारखे तटकन तोडून टाकले.

शास्ते 16:21

मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर घान्य दळायला लावले.

योहान 18:29

म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या माणसावर कोणता आरोप करीत आहात?”

प्रेषितांचीं कृत्यें 12:6

पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.

प्रेषितांचीं कृत्यें 20:23

मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो

प्रेषितांचीं कृत्यें 21:11

त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वत:चे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे महणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्याला यरुशलेमा येथील यहूदी लोक असेच बांधतील व यहूदीतरांच्या हाती देतील.”

प्रेषितांचीं कृत्यें 22:24

त्याने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा. अशा प्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते.

प्रेषितांचीं कृत्यें 22:29

जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते, ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते. व पौल हा रोमी नागरिक होता. त्यामुळे तो घाबरला.

प्रेषितांचीं कृत्यें 25:16

वादी व प्रतिवादी यांना एकमेकांसमोर आणल्याशिवाय आणि आरोपीला आपला बचाव करण्याची संधि मिळेपर्यंत, त्याला इतरांकडे सोपविण्याची रोमी लोकांची रीत नाही. असे मी यहूदी लोकांना सांगितले.

प्रेषितांचीं कृत्यें 26:29

पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंति आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 28:20

या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली. कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळदंडानी जखडलो गेलो आहे.”

इफिसकरांस 6:20

त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.

2 तीमथ्थाला 1:16

अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.

2 तीमथ्थाला 2:9

कारण सुवार्तेमुळे मी दु:ख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे शिक्षण बांधले गेले नाही.

Interlinear

Choose Theme