Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 21:2 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 21:2 · मराठी बायबल

तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हांला आढळले. तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.

Cross references

योना 1:3

योनाला परमेश्वराची आज्ञा पाळायची नव्हती. म्हणून योनाने परमेश्वरापासून दूर पळून जाण्यची प्रयत्न केला. योना याफोला गेला. योनाला तार्शिस या खूप दूरच्या नगराला जाणारे गलबत सापडले. योनाने सफरीचे पैसे भरले व तो गलबतावर चढला. गलबतावरील लोकांबरोबर योनाला तार्शिसला जाण्याची इच्छा होती. त्याला परमेश्वरापासून दूर पळायचे होते.

प्रेषितांचीं कृत्यें 11:19

स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वासणारे पांगले. यतील काही दूरच्या ठिकाणी, उदा. फेनीके, कुप्र व अंत्युखियापर्यंत गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांनाच सुवार्ता सांगितली.

प्रेषितांचीं कृत्यें 15:3

मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके व शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:6

तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्झांद्रीयाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हांला त्या जहजात बसविले.

Interlinear

Choose Theme