युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, जेव्हा त्याला उचलले, तेव्हा तो मेलेला आढळला.
Cross references
एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्याला ठेवले.
गलबत बुडू नये म्हणून गलबतावरचे वजन कमी करावे असे गलबतावरील लोकांना वाटले. म्हणून त्यांनी गलबतावरील माल समुद्रात टाकण्यास सुरवात केली. खलाशी खूपच घाबरले होते. प्रत्येकजण आपापल्या दैवतांची प्रार्थना करु लागले. योना झोपण्यासाठी गलबताच्या खालच्या तळाच्या भागात गेला होता. तो तेथे झोपला होता.
मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय?
नंतर तो अशुद्ध आत्मा किंचाळला व मुलाला अगदी पिळवटून बाहेर निघाला. मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांना वाटले, तो मेला.
जर तो अचानक आला तर तुम्ही त्याला झोपलेले सापडू नका.
नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.