Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 20:18 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 20:18 · मराठी बायबल

8जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हांना माहीत आहे.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 18:19

मग ते इफिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांना तेथे सोडले. तो सभास्थानान गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.

प्रेषितांचीं कृत्यें 19:1

तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:10

हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांपर्यंत प्रभु येशूचे वचन पोहोंचले.

2 करिंथकरांस 1:12

कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामणिकपणे जगात व विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो.

2 करिंथकरांस 6:3

आमची सेवा दोषी ठरु नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही.

1 थेस्सलनीकाकरांस 1:5

कारण आमची सुवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने आली हे तुम्हांला माहीत आहे, आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हांला माहीत आहे. ते तुमच्या फायद्यासाठी होते.

1 थेस्सलनीकाकरांस 2:1

बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही.

2 थेस्सलनीकाकरांस 3:7

मी तुम्हांला हे सांगतो कारण तुम्ही स्वत: जाणता की तुम्ही आमचे अनुकरण कसे करायचे, कारण आम्ही तुमच्यामध्ये आळशी नव्हतो.

2 तीमथ्थाला 3:10

तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीति, माझी सहनशीलता ही पाळली आहेस.

Interlinear

Choose Theme