Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 19:32 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 19:32 · मराठी बायबल

एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करु लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करु लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला. आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या नाय्यभवनात एकत्र का आलोत.

Cross references

मत्तय 11:7

मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, “तुम्ही वैरण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?

लूक 7:24

योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला: “वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेल बोरु?

प्रेषितांचीं कृत्यें 19:29

शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला. आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदिनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:40

आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरु केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीति आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 21:34

गर्दितून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना. म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे.

Interlinear

Choose Theme