आम्ही त्याच्यासह राहतो आम्ही त्याच्यासह चालतो आम्ही त्याच्यासह आहोत.’तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे:‘आम्ही त्याची मुले आहोत’
Cross references
कोणी तुमच्या जिवावर उठले तर परमेश्वर तुमचे रक्षण करील. पण गोफणीतीले धोंड्याप्रमाणे त्या मारेकऱ्याचा मात्र जीव घेईल.
जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक माणूस देवाच्या अधिपत्याखाली असतो.
परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.
देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो.
नाही! तू नम्र झाला नाहीस उलट तू स्वर्गातल्या देवाच्याविरुध्द गेलास. देवाच्या मंदिरातील प्याले आणण्याचा तू हुकूम दिलास. त्या प्याल्यातून तू, तुझे राजदरबारी, तुझ्या स्त्रिया आणि दासी मद्य प्यालात, आणि सोने-चांदी, कासे, लोखंड, लाकूड वा दगड यांच्यापासून बनविलेल्या देवतांची तू स्तुती केलीस. ते खरे देव नाहीत. ते पाहू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत. त्यांना काही समजत नाही तू, तुझ्या जीवनावर व तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या देवाचे प्रभुत्व आहे, त्याचा मान राखला नाहीस.
केनान अनोशाचा मुलगा होता. अलोश शेथाचा मुलगा होता. शेथ आदामाचा मुलगा होता. आदाम देवाचा मुलगा होता.
देव मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.”
खुद्द पित्यापासून (देवापासून) जीवनाचा लाभ होतो. म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे.
येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल.
सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासूनत तो अस्तित्वात आहे. सर्व गोष्टी त्याच्याद्वारे चालतात.
त्यांच्यापैकीच एक क्रेतीय संदेष्टा (भविष्यवादी) स्वत:म्हणाला, ʇक्रेतीय नेहमीच खोटारडे आहेत. दुष्ट पशू आणि आळशी, खादाड आहेत.ʈ
पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला.
याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?