Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 15:33 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 15:33 · मराठी बायबल

यहूदा व सीला काही काळ तेथे राहिल्यानंतर ते निघून गेले. बंधूंकडून त्यांना शांतीचा आशीर्वाद मिळाला, ज्या यरुशलेममधील बंधूनी यहूदा व सीला यांना पाठवले होते, त्यांच्याकडे ते परत गेले.

Cross references

उत्पत्ति 26:29

आम्ही तुला त्रास दिला नाही त्याच प्रमाणे आता तुही आम्हाला त्रास देणार नाही असा तू आमच्याशी करार करावा; आम्ही तुला घालवून दिले हे खरे आहे, परंतु तुला आम्ही शांतीने जाऊ दिले; परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे.”

निर्गम 4:18

मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो इथ्रोला म्हणाला, “मला मिसरला माझ्या भाऊबंदाकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.”इथ्रो म्हणाला, “तू शांततेने जा.”

मार्क 5:34

येशू त्या स्त्रीला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.

प्रेषितांचीं कृत्यें 16:36

तुरुंग आधिकारी पौलाला म्हणाला, “पुढाऱ्यांनी या शिपायांना तुम्हाला सोडण्याविषयी सांगितले आहे. तुम्ही आता जाऊ शकता. शांतीने जा.”

1 करिंथकरांस 16:11

यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला शांतीने पाठवा. कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.

इब्री लोकांस 11:31

राहाब वेश्येच्या विश्वासामुळेच ज्या लोकांनी आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले.

2 योहान 1:10

जर एखादा मनुष्यतुमच्या घरी आला आणि ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणीत नसला तर त्याला आपल्या घरात घेऊ नका. किंवा त्यालासलामही करु नका.

Interlinear

Choose Theme