Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 15:30 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 15:30 · मराठी बायबल

मग पौल, बर्णबा, यहूदा व सीला यांनी यरुशलेम सोडले. ते अंत्युखियास गेले. अंत्युखियात त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले. आणि त्यांना ते पत्र दिले.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 6:2

बारा प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले. प्रेषित त्यांना म्हणाले, “देवाचे वचन शिकविण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही! लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले.

प्रेषितांचीं कृत्यें 16:4

मग पौल व त्याच्याबरोबर असलेले लोक इतर शहरांमधून प्रवास करीत निघाले. यरुशलेममधील प्रेषितांनी व वडीलजनांनी दिलेले नियम व त्यावरचे निर्णय ते विश्वासणाऱ्यांना देत गेले. त्यांनी विश्वासणाऱ्यांना त्या नियमांचे पालन करण्यास सांगितले.

प्रेषितांचीं कृत्यें 21:22

मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल.

प्रेषितांचीं कृत्यें 23:33

जेव्हा पौल व घोडेस्वार कैसरियास पोहोंचले, तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले. व पौलाला त्याच्या स्वाधीन केले.

Interlinear

Choose Theme