देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांना दिल्या.
Cross references
हारान सोडताना तो एकटा नव्हता तर त्याने आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले व तो कनान देशाच्या प्रवासास निघाला आणि कनान देशात आला.
ज्या प्रदेशामधून तू जात आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजाला कायमचा देईन आणि मी तुमचा देव होईन.”
“जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल.
“जो देश वतन करुन घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तेथून घालवून देईल.
एलाजार याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि इस्राएलमधील सर्व वंशांचे प्रमुख यांनी जमिनीच्या वाटण्या कशा करायच्या ते ठरविले.
यहोशवाने शिलोला परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकल्या. अशा प्रकारे जमिनीची विभागणी होऊन प्रत्येक वंशाला जमिनीत आपापला वाटा मिळाला.
अशाप्रकारे या जमिनीच्या वाटण्या इस्राएलच्या सर्व वंशांच्या लोकांमध्ये झाल्या. एलाजार हा याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि वडील धारी मंडळी या कामासाठी शिलो येथे जमली होती. परमेश्वरासमोर सभामंडपाच्या प्रवेशद्धारात ते एकत्र जमले. अशाप्रकारे हे वाटपाचे काम समाप्त झाले.
यार्देन नदी आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र यांच्या मधली जमीन तुम्ही काबीज करू शकता हे मी तुम्हाला सांगितल्याचे तुमच्या लक्षात असेलच. ती भूमी तुम्हाला द्यायचे मी वचन दिले आहे, पण अजून तुम्ही ती ताब्यात घेतली नाही.
मग तुम्ही यार्देन नदी पार करुन यरीहो येथे आलात. यरीहा मधील लोकांनी तुमच्याशी लढाई केली. अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी, यबूसी यांनीही लढाई केली. पण माझ्यामूळे तुम्ही त्यांचा पराभव करु शकलात.
या वंशजांनी तो प्रदेश घेतला. तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला. तूच त्यांच्या हातून हा पराभव करवलास. हे देश, तिथले लोक आणि राजे यांच्याशी तू त्यांना मन मानेल तसे वागू दिलेस
देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले. देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला. देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्व:तचे घर दिले.
देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
त्यांचे काय करायचे ते देवाने ठरविले, नंतर देवाने त्यांच्यासाठी जागा निवडली. देवाने रेघ काढून त्यांना त्यांची जागा दाखविली. ते प्राणी ती जागा कायमची व्यापतील. वर्षांनुवर्षे ते तेथे राहतील.
नंतर यहोशवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करुन इतर देशांच्या जमिनी काबिज केल्या. ती राष्टे परमेश्वरानेे आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हाच तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दावीदाच्या काळापर्यंत तो ठेवला.