Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 10:20 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 10:20 · मराठी बायबल

ऊठ आणि पायऱ्या उतरुन खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे. काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.”

Cross references

यशया 48:16

इकडे या आणि माझे ऐका. बाबेल राष्ट्र म्हणून जगायला लागले तेव्हा मी तेथे होतो आणि आरंभापासून मी स्पष्टपणे बोललो का तर लोकांना मी काय म्हणालो ते समजावे.”नंतर यशया म्हणाला, “आता परमेश्वर माझा देव, मला आणि त्याच्या आत्म्याला पुढील गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवितो.

जखऱ्या 2:9

बाबेलच्या लोकांनी माझ्या लोकांना कैदी म्हणून पकडून नेले. आणि त्यांना गुलाम बनवले. पण मी त्यांचा पराभव करीन आणि ते माझ्या लोकांचे गुलाम होतील. तेव्हा तुम्हाला पटेल की सर्वशक्तिमान परमेश्वराने मला पाठविले आहे.”

मार्क 16:15

तो त्यांना म्हणाला, ‘संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’

प्रेषितांचीं कृत्यें 8:26

देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा - तो रस्ता वाळवंटातून जातो.”

प्रेषितांचीं कृत्यें 9:15

परंतु प्रभु म्हणाला, “जा! एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे, माझ्याविषयी त्याने राजांना, यहूदी लोकांना, आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे.

प्रेषितांचीं कृत्यें 9:17

हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभु येशूने मला पाठविले. ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले, येशूने मला पाठविले यासाठी की, तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास.”

प्रेषितांचीं कृत्यें 13:4

पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीया शहराला गेले. नंतर ते समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:7

त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. मग पेत्र उभा राहिला. आणि त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूनो मला माहीत आहे, सुरुवातीला जे काही घडले, ते तुमच्या आठवणीत आहे. जे यहूदी नाहीत, त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्यामधून देवाने माझी निवड केली. यासाठी की, त्यांनीही विश्वास धरावा.

Interlinear

Choose Theme