2 शमुवेल 6:8 · मराठी बायबल
या घटनेमुळे दावीद फार खिन्न झाला आणि त्याने या जागेचे नाव “पेरेस-उज्जा” म्हणजेच “उज्जाला शासन” असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.
Cross references
1 इतिहास 13:11
देवाने उज्जावर असा राग काढावा याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हा पासून आजतागायत त्या ठिकाणाचे नाव “पेरेस-उज्जा” असे आहे.
1 इतिहास 15:13
गेल्या वेळी हा कोश कसा आणवा याबद्दल आपण परमेश्वराला विचारले नाही. तुम्हा लेवींनी तो आणला नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला ती शिक्षा दिली.”
योना 4:1
परमेश्वराने नगरी वाचविली, ह्याचा योनाला आनंद झाला नाही तर उलट तो रागावला.
योना 4:9
पण परमेशवर त्याला म्हणाला हा वेल मेला म्हणून रागावणे तुला योग्य वाटते का?”योना उत्तरला, हो माझा राग अगदी बरोबर आहे मी रागाने मरुन जाण्याइतका रागावलो आहे.”