2 शमुवेल 3:21 · मराठी बायबल
अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांना मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.”तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला.
Cross references
2 शमुवेल 2:9
आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामी आणि सर्व इस्राएलयांच्यावर राजा म्हणून नेमले.
2 शमुवेल 3:12
अबनेरने दूतांकरवी दावीदाला निरोप पाठवला, “ह्या प्रदेशांवर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याशबरोबर करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”
1 राजे 11:37
बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.
स्तोत्रसंहिता 20:4
तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो. तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
फिलिप्पैकरांस 2:21
सर्व जण त्यांच्या हिताकडेच लक्ष देतात व ख्रिस्ताच्या हिताकडे लक्ष देत नाहीत.