Home Bibles 2 शमुवेल 23:17 · मराठी बायबल
2 शमुवेल 23:17 · मराठी बायबल

दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.

Cross references

उत्पत्ति 9:4

पण मी तुम्हांस एक आज्ञा देतो की रक्तासकट मांस तुम्ही खाऊ नका कारण रक्त हे त्याचे जीवन आहे;

उत्पत्ति 44:17

परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही! फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.”

लेवीय 17:10

“इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैसी कोणी रक्त खाईल! तर मी देव त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.

शास्ते 5:18

पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युध्दात प्राणांची पर्वा न करता पराक्रम केला.

1 शमुवेल 2:30

“तुझे घराणेच निरंतर त्याची सेवा करील असे इस्राएलचा देव जो परमेश्वर याने म्हटले होते खरे. पण आता त्याचे म्हणणे असे आहे की, ‘इथून पुढे असे होणार नाही. माझा आदर ठेवतात त्यांचा मी मान राखीन. पण जे अनादर करतात त्यांच्यावर संकटे कोसळतील.

1 शमुवेल 26:11

पण परमेश्वराने निवडलेल्या राजाला मारायची वेळ परमेश्वर माझ्यावर आणणार नाही. तू फक्त त्याच्या उशाजवळचा भाला आणि पाण्याचा तांब्या उचल आणि मग आपण जाऊ”

2 शमुवेल 20:20

यवाब म्हणाला, “मला कशाचाच नाश करायची इच्छा नाही. तुमच्या नगराची नासधूस मी करु इच्छित नाही.

1 राजे 21:3

नाबोथ म्हणाला, “माझी जमीन मी देणार नाही. ती माझ्या कुटुंबाचे वतन आहे.”

1 इतिहास 11:19

दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी न प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले.

स्तोत्रसंहिता 72:14

जे दुष्ट लोक त्यांना दु:ख द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून राजा त्यांना वाचवतो. राज्याला त्या गरीबांचे आयुष्य खूप मोलाचे वाटते.

मत्तय 26:28

हे नवा करार प्रस्थापित करते. ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे. यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी.

मार्क 14:24

मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचेरक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.

योहान 6:52

नंतर यहुदी आपापसात वाद घालू लागले. ते म्हणाले, “हा मनुष्य आपले स्वत:चे शरीर आम्हांला कसे काय खायला देऊ शकेल?”

1 करिंथकरांस 15:30

आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो?

Interlinear

Choose Theme