Home Bibles 2 शमुवेल 23:12 · मराठी बायबल
2 शमुवेल 23:12 · मराठी बायबल

पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यंाचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला.

Cross references

2 शमुवेल 23:10

थकून अंगात त्राण राहिलं नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवार घटृ पकडून त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग लोक तिथे आले. पण शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते आले.

स्तोत्रसंहिता 3:8

परमेश्वरा, जय तुझाच आहे. परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.

स्तोत्रसंहिता 44:2

देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.

नीतिसूत्रे 21:31

लोक युध्दासाठी घोड्यांसकट सर्व तयारी करु शकतात, पण परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिल्याखेरीज ते युध्द जिंकू शकत नाहीत.

Interlinear

Choose Theme