Home Bibles 2 शमुवेल 22:35 · मराठी बायबल
2 शमुवेल 22:35 · मराठी बायबल

युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करु शकतात.

Cross references

स्तोत्रसंहिता 18:33

देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो. तो मला उंचावर स्थिर ठेवतो.

स्तोत्रसंहिता 46:9

परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.

स्तोत्रसंहिता 144:1

परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.

यहेज्केल 39:3

पण मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य व उजव्या हातातील बाण खाली पाडीन.

यहेज्केल 39:9

“तेव्हा इस्राएलच्या गावांत राहणारे लोक त्या रानांत जातील. ते शत्रूची शस्त्रे गोळा करुन जाळतील. ते सर्व ढाली, धनुष्य बाण, दंड व भाले जाळतील. ते ह्या शस्त्रांचा उपयोग सरपण म्हणून सात वर्षे करतील.

Interlinear

Choose Theme