2 शमुवेल 22:12 · मराठी बायबल
परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.
Cross references
2 शमुवेल 22:10
आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काव्व्याकुटृ ढगावर उभा राहिला.
ईयोब 36:29
देव ढगांची पखरण कशी करतो किंवा आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो ते कुणाला कळत नाही.
स्तोत्रसंहिता 18:11
परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता. तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.
स्तोत्रसंहिता 27:5
मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
स्तोत्रसंहिता 97:2
परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.