Home Bibles 2 शमुवेल 21:4 · मराठी बायबल
2 शमुवेल 21:4 · मराठी बायबल

तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, “शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हाला हक्क नाही.”दावीद म्हणाला, “ठीक तर, तुमच्यासाठी मी आता काय करावे?”

Cross references

उत्पत्ति 30:31

लाबानेने विचारले, “तर मग मी तुला काय देऊ?”याकोबाने उत्तर दिले, “तुम्ही मला काही द्यावे असे मला नको आहे. मला फक्त मी केलेल्या सेवाचाकरीचा मोबदला पाहिजे; एकढी एकच गोष्ट करा, म्हणजे मग मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन;

स्तोत्रसंहिता 49:6

काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत.

1 पेत्र 1:18

तुम्हांला माहीत आहे की, सोने किंवा चांदी अशा कोणत्याही नाश पावणाऱ्या वस्तूंनी निरर्थक जीवनापासून तुमची सुटका करण्यात आली नाही. जी तुम्हांला तुमच्या पूर्वजापासून मिळाली आहे.

Interlinear

Choose Theme