Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 19:41 · मराठी बायबल
2 शमुवेल 19:41 · मराठी बायबल

सर्व इस्राएल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, “आमचे बांधव यहूदी यांनी तुमचा ताबा घेऊन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करुन आणले असे का?”

Cross references

उत्पत्ति 31:26

लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला का फसवलेस? युद्धात धरुन नेलेल्या स्त्रियां प्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास?

शास्ते 8:1

एफ्राईम लोक गिदोनवर चिडले होते. त्यामुळे गिदोनला भेटले तेव्हा त्यांनी विचारले, “तू मिद्यान्यांवर चढाई केलीस तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? आम्हाला तू वागणूक का दिलीस?”

शास्ते 12:1

एफ्राइमच्या लोकांनी सैन्याची जमवाजमव केली आणि नदी ओलांडून ते साफोन येथे गेले. ते इफ्ताहला म्हणाले, “अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तू आम्हाला मदतीसाठी का बोलावले नाहीस? आता आम्ही तुझ्यासकट तुझ्या घराला आग लावतो.”

2 शमुवेल 19:3

ते शांतपणे नगरात परतले. युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते.

योहान 7:5

येशूच्या भावांनीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.

Interlinear

Choose Theme