Home Bibles 2 शमुवेल 18:8 · मराठी बायबल
2 शमुवेल 18:8 · मराठी बायबल

देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मेली.

Cross references

निर्गम 15:10

परंतु तू त्यांच्यावर फुंकर वायु सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले; ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल पाण्यात तळापर्यंत बुडाले.

यहोशवा 10:11

इस्राएल सैन्य बेथ-होरोनपासून अजेकापर्यंत पाठलाग करत असताना परमेश्वराने शत्रूवर आकाशातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव केला. त्या मारानेच अनेकजण ठार झाले. इस्राएल सैन्याच्या तलवारीने जितके शत्रूसैन्य प्राणाला मुकले त्यापेक्षा कितीतरी जास्त या गारांच्या वर्षावाला बळी पडले.

शास्ते 5:20

स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या कक्षेतून सीसराशी लढले.

1 राजे 20:30

जे बाचवले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता.

स्तोत्रसंहिता 3:7

परमेश्वरा जागा हो! देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस तू जरमाझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस तर त्यांचे सगळे दात पडतील.

स्तोत्रसंहिता 43:1

देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे. तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर. माझा बचाव कर. मला त्या माणसापासून वाचव.

नीतिसूत्रे 24:21

मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस.

नीतिसूत्रे 24:22

का? कारण त्या प्रकारच्या माणसांचा लगेच नाश होऊ शकतो. देव आणि राजा त्यांच्या शत्रूंसाठी किती संकटे निर्माण करु शकतात हे तुम्हाला माहीत नाही.

Interlinear

Choose Theme