Home Bibles 2 शमुवेल 13:22 · मराठी बायबल
2 शमुवेल 13:22 · मराठी बायबल

अबशालोमला अम्नोनचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनने आपल्या बहिणीशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.

Cross references

उत्पत्ति 24:50

मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “आपण परमेश्वराच्या प्रेरणेने आला आहा हे आम्ही समजतो; जे त्याच्या इच्छेप्रमाणे घडलेच पाहिजे ते आम्ही बदलू शकत नाही;

उत्पत्ति 31:24

त्या रात्री देव लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “लाबाना, सावधान! तू याकोबाशी बोलताना प्रत्येक शब्द संभाळून वापर.”

उत्पत्ति 31:29

खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे परंतु गेल्या रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात आला आणि मी तुला कोणत्याच प्रकारे अपाय करु नये म्हणून त्याने मला ताकीद दिली आहे;

लेवीय 19:17

“आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.

नीतिसूत्रे 10:18

जो माणूस त्याचा मत्सर लपवतो तो खोटे बोलत असतो. पण केवळ मूर्खच पसरवता येण्यासारख्या अफवा शोधण्याचा प्रयत्न करतो.

नीतिसूत्रे 25:9

जर तुमचे आणि दुसऱ्या माणसाचे एकमत होत नसेल तर काय करायचे ते आपसात ठरवा आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी कुणाला सांगू नका.

नीतिसूत्रे 26:24

दुष्ट मनुष्य आपल्या बोलण्याने चांगले दिसण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपल्या दुष्ट योजना आपल्या मनात लपवण्याचा प्रयत्न करतो.

नीतिसूत्रे 26:26

तो त्याच्या दुष्ट योजना चांगल्या शब्दांनी लपवतो. पण तो फारच नीच असतो आणि शेवटी तो ज्या वाईट गोष्टी करतो त्या सर्वांना दिसतील.

नीतिसूत्रे 27:4

राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो.

उपदेशक 7:9

चटकन राग येऊ देऊ नका. का? कारण रागावणे हा मूर्खपणा आहे.

मत्तय 18:15

“जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. जर त्यांने किंवा तिने तुझे ऐकले तर त्याला किंवा तिला आपला बंधु किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस.

इफिसकरांस 4:26

‘तुम्ही रागवा पण पाप करु नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा.

इफिसकरांस 4:31

सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी.

1 योहान 2:9

जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे.

1 योहान 2:11

पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळतनाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे.

1 योहान 3:15

जो कोणीआपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेलेअनंतकाळचे जीवन मिळत नाही.

Interlinear

Choose Theme