Home Bibles 2 शमुवेल 11:3 · मराठी बायबल
2 शमुवेल 11:3 · मराठी बायबल

तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली. सेवकाने सांगितले, “ती अलीयमची मुलगी बथशेबा उरीया हित्ती याची ती पत्नी.”

Cross references

2 शमुवेल 23:34

माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम,

2 शमुवेल 23:39

उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.

1 इतिहास 3:5

तिथे जन्मलेली दावीदाची मुले खालीलप्रमाणे:बथशूवाला चार मुलगे झाले. बथशूवा अम्मीएलची मुलगी. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे मुलगे.

1 इतिहास 11:41

उरीया हित्ती, अहलयाचा मुलगा जाबाद,

नीतिसूत्रे 6:25

ती स्त्री सुंदर असेल. पण ते सौंदर्य तुझ्यात जळू देऊ नकोस आणि तुला त्याची भुरळ पडू देऊ नकोस. तू तिच्या डोळ्यांनी जायबंदी होऊ नकोस.

यिर्मया 5:8

ते लोक, भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे आहेत. शेजाऱ्याच्या बायकोला वासनेने हाका मारणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते आहेत.

होशेय 7:6

लोक कट रचतात. त्यांची मने तापलेल्या भट्टीप्रमाणे उत्तेजित होऊन जळतात. त्यांच्या मनातील खळबळ रात्रभर जळत राहाते. आणि सकाळी ती अतितप्त विस्तवाप्रमाणे होते.

याकोब 1:14

तर प्रत्येक जण त्याच्या स्वत:च्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो.

Interlinear

Choose Theme