उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले. तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.
Cross references
त्यानंतर आपला आशीर्वाद हिरावून घेतल्याबद्दल एसाव याकोबाचा द्वेष करु लागला; एसाव विचार करुन स्वत:शीच म्हणाला, “लवकरच माझा बाप मरुन जाईल आणि बापाच्या वियोगामुळे मला दु:ख होईल; परंतु त्यानंतर मात्र मी याकोबाला ठार मारीन.”
दावीदाने यवाब व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांना सांगितले, “तुमची ही वस्त्रे फाडा आणि शोक झाला असल्याचे दाखवणारी वस्त्रे घाला. अबनेरच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त करा.” त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्व जण यांनी विलाप केला.
तेव्हा तकोवा येथे निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर बाईला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, “तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्याला शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या बाईसारखी तू दिसली पाहिजेस.
यावर अहाबने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला.