Home Bibles 2 राजे 9:8 · मराठी बायबल
2 राजे 9:8 · मराठी बायबल

म्हणजे अहाबचे घराणे नष्ट होईल. अहाबच्या घराण्यात एकही पुरुष संतान जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम.

Cross references

अनुवाद 32:36

“परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करुन सोडील.

1 शमुवेल 25:22

आता मात्र त्याच्या कुटुंबातील एकजण जरी उद्यापर्पंत शिल्लक राहिला तरी देव मला शिक्षा करील.”

1 राजे 14:10

तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काहीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन.

1 राजे 21:21

तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, ‘मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना ठार करीन.

2 राजे 10:17

शोमरोनला पोंचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबीय अजून जिवंत होते त्या सर्वाना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.

2 राजे 14:26

इस्राएलचे दास काय किंवा स्वतंत्र माणसे काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, हे परमेश्वराने पाहिले. यातला कोणीच इस्राएलला वर आणण्याच्या पात्रतेचा नाही हे त्याने ओळखले

2 राजे 19:17

खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. 17खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत.

2 राजे 21:13

शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबच्या घराण्याचा ओळंबा मी यरुशलेमवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करुन ठेवावी तशी मी यरुशलेमची गत करीन.

Interlinear

Choose Theme