आणखी एका गोष्टीसाठी परमेश्वराने मला क्षमा करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. अरामचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या खोट्या दैवतांच्या पूजेला जातील. ते माझा आधार मागतील तेव्हा मला ही तिथे नमन करावे लागले असे झाले असता परमेश्वराने मला क्षमा करावी, माझी ही विनंती आहे.
Cross references
त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे;मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
इस्राएल नसले लीही काही माणसे अजून आपल्यात आहेत. ती त्यांच्या दैवतांची पूजा करतात. अशा लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्या दैवतांची सेवा किंवा पूजा करु नका.
एलीया, इस्राएलमध्ये तूच काही एकटा निष्ठावान नाहीस. तेही बरेच जणांना मारतील. आणि तरीही, बालपुढे कधी वाकले नाहीत असे सातजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
तेव्हा राजाच्या अगदी निकट असलेला एक अधिकारी अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने आकाशाला खिंडारे पाडली तरी असे घडणे शक्य नाही.”अलीशा त्याला म्हणाला, “आपल्या डोळ्यांनी तू ते बघशीलच पण तू मात्र त्यातले काही खाऊ शकणार नाहीस.”
आपल्या निकटच्या कारभाऱ्याला राजाने वेशीवर द्वारपाल म्हणून नेमले पण लोक शत्रूच्या छावणीवर अन्नासाठी तूटून पडले तेव्हा या द्वारपालाला तुडवून पुढे गेले. त्यामुळे तो मरण पावला. अलीशा या संदेष्ट्याकडे राजा आला होता तेव्हा त्याने जे जे सांगितले त्या बरहुकूमच हे घडले.
परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला होता. त्यात परमेश्वर म्हणाला होता, “इतर दैवतांची पूजा सेवा तुम्ही करता कामा नये त्यांच्यासाठी यज्ञ करता कामा नयेत.
एफ्राइम, मनश्शे, इस्साकार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांना मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुध्दीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्र स्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी शुचिर्भूत झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.”
परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक, इस्राएलचे अपराध शोधण्याचे कसून प्रयत्न करतील. पण अपराध असणारच नाही. लोक यहूदाची पापे शोधण्याचे प्रयत्न करतील. पण त्यांना एकही पाप सापडणार नाही. का? कारण मी इस्राएलमधील व यहूदातील काही वाचलेल्या लोकांचे रक्षण करीन आणि त्यांनी पाप केले असले तरी त्यांना क्षमा करीन.”