Home Bibles 2 राजे 5:12 · मराठी बायबल
2 राजे 5:12 · मराठी बायबल

अबाना आणि परपर या दिमिष्कातील नरुा इस्राएलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करुन मी शुध्द का होऊ नये?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.

Cross references

यहोशवा 3:15

(सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले.

2 राजे 2:8

एलीयाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुंभगले. अलीशा आणि एलीया मधल्या कोरडया वाटेने नदी पार करुन गेले.

2 राजे 2:14

अलीशाने पाण्यावर वार केल्याबरोबर पाणी डावीउजवीकडे दुभंगले. मग अलीशा नदी पार करुन गेला.

2 राजे 5:17

तेव्हा नामान म्हणाला, “माझ्या कडून तुम्ही भेट तर घेत नाहीच. मग एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी इस्राएलची माती नेण्याची मला मुभा द्यावी.म्हणजे मी यापुढे दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली अर्पण करणार नाही. फक्त परमेश्वरासाठीच यज्ञ करीन.

नीतिसूत्रे 14:17

जो माणूस चटकन् रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो. शहाणा मनुष्य सहनशील असतो.

नीतिसूत्रे 19:11

जर माणूस शहाणा असला तर त्याचा शहाणपणा त्याला सहनशीलता देतो. आणि तो जेव्हा चूक करणाऱ्यांना क्षमा करतो. तेव्हा तर ते खूपच चांगले असते.

गीतरत्न 4:8

लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनमधून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून, चित्यांच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.

यहेज्केल 47:1

त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या दाराशी नेले. मंदिराच्या पूर्वेकडील उंबऱ्याच्या खालून पाणी वाहताना मला दिसले (मंदिराचे तोंड पूर्वेला होते.) मंदिराच्या दक्षिणेच्या भागाखालून पाणी वेदीच्या दक्षिणबाजूने वाहात होते.

जखऱ्या 13:1

त्यावेळी दावीदाच्या वंशासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पाण्याचा नवा झरा फुटेल. त्याचा उपयोग लोकांची पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी होईल.

जखऱ्या 14:8

तेव्हा यरुशलेममधून सतत जिवंत पाण्याचा झरा वाहीलत्याला दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाईल तर दुसरा पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल. तो संपूर्ण वर्षभर - हिवाळ्यात व उन्हाळ्यात वाहील.

मार्क 1:9

त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला.

Interlinear

Choose Theme