अलीशाचा सेवक म्हणाला, “काय? इथे तर शंभर माणसे आहेत. एवढ्या सगळ्यांना हे कसे पुरेल?”पण अलीशाने त्याला सांगितले, “तू खुशाल ते आहे तेवढे या सर्वांना दे. ‘ते पोटभर खातील आणि शिवाय त्यातून उरेल,’ असे परमेश्वर म्हणतो.”
Cross references
एवढ्या लोकांना पुरेल एवढे मांस माझ्याजवळ नाही! आणि त्यांची तर माझ्यामागे कुरकुर चालूच आहे. ते म्हणतात, ‘आम्हाला खावयास मांस दे!
परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराचा हात असमर्थ तोकडा पडला आहे काय? मी माझे म्हणणे खरे करुन दाखवीन हे तुला दिसेल.”
परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना खायला द्या.”
ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरुन घेतल्या.
शिष्य त्याला म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाट्या गोळा केल्या.
पण येशून हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपापसामध्ये का करता?
परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्याला म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशी दीनारांच्याभाकरी विकत आणाव्या काय?”
मग ते सर्व जेवून तृप्त झाले.
त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “या निर्जन जागी एवढ्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी कोण मिळवू शकेल काय?”
चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या? शिष्यांनी उत्तर दिले, “सात टोपल्या.”
पण तो त्यांना म्हणाला, “तुम्ही त्यांना काही खावयास द्या.”ते म्हणाले, “आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत घ्यावे असे तुम्हांला वाटते काय? आमच्याजवळ फक्त पाच भाकरी आणि दोन मासे याशिवाय काही नाही.”
लोक जेवले व सर्व तृप्त झाले. आणि जेवून झाल्यानंतर उरलेले गोळा करण्यात आले तेव्हा त्या तुकड्यांच्या बारा टोेपल्या भरल्या.
आंद्रिया म्हणाला, “येथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत.”
मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.