यावर एकजण रानात पाला गोळा करुन आणायला गेला. तेव्हा त्याला एक रानवेल दिसला. त्याची फळे तोडून त्याने ती फळे कापून अग्निवरच्या भांड्यात टाकली. परंतु ती फळे कशाची आहेत ते काही त्या संदेष्ट्यांना माहीत नव्हते.
Cross references
काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.
माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी आणखी काय करू शकलो असतो? मला जे करणे शक्य होते ते सर्व मी केले मी चांगल्या पिकाची आशा केली पण पीक वाईट आले. असे का झाले?
यहूदा, मी खास वेल म्हणून तुला लावले. तुम्ही सर्वजण उत्तम बीजाप्रमाणे होता. मग वाईट फळे देणाऱ्या वेलीत तुझे रुपांतर कसे झाले?
पण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊ नये व इतर लोकांची मने कलुषित करू नये, म्हणून जपा.