प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त आणि निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करुन चांगल्या शेतांची नासाडी कराल.”
Cross references
“मला परमेश्वर येताना दिसतो, पण एवढ्यात नाही. तो मला एवढ्या लवकर येताना दिसत नाही. याकोबच्या घराण्यातून एक तारा उदय पावेल इस्राएल मधून एक राजा निघेल. तो राजा मवाबच्या लोकांना चिरडून टाकील. सेथच्या सर्व मुलांचा तो चुराडा करील.
“युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.
पण ज्यांना फळ येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेपर्यंत युद्धासाठी लागणारी शस्त्र बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा.
तेव्हा परमेश्वर गिदेनला म्हणाला, “मी तुझ्या बरोबर आहे तू मिद्यानी लोकांचा पराभव करू शकशील आपण एकाच माणसाशी लढत आहोत असे तुला वाटेल.”
तेव्हा आता त्यांच्याशी जाऊन लढ. त्यांचा आणि त्यांच्या मालमत्तेचा पूर्णपणे बीमोड कर. काहीही शिल्लक ठेवू नकोस. पुरुष, बायका, मुले, अगदी तान्ही बाळेसुध्दा मारुन टाक. त्याची गुरे, मेंढरे, उंट, गाढवे या सर्वाचा संहार कर.”
दावीदाने परमेश्वराला विचारले, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु का?”परमेश्वराने सांगितले, “जरुर पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाचे रक्षण कर.”
इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली. पिके उभी असलेल्या त्यांच्या शेतात दगडांचा मारा केला. झरे, विहिरी बुजवल्या. झाडे आडवी केली. कीर हरेसेथला वेढा घालून या नगराचाही पाडाव केला.
अलीशा त्याला म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्याला बाण मारायला सांगितले.योवाशने बाण सोडला. अलीशा त्याला म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामवरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”