फारो-नखोने हमाथ देशातील रिब्ला येथे यहोआहाजला बेड्या घातल्या. त्यामुळे यहोआहाजला यरुशलेममध्ये राज्य करता येईना. फारो-नखोने यहूदाकडून साडेसात हजार पौंड चांदी आणि पंचाहत्तर पौंड सोने जबरदस्तीने वसूल केले.
Cross references
“दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर बाईला लागला आणि त्या बाईचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाही तर ज्याचा धक्का तिला लागला तिचा नवरा न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा.
म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला.
शफामपासून ती अईनच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा गालीली तलावाजवळच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.
शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्या - पिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.
तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला. निरोपात हिज्कीयाने म्हटले, “माझ्या हातून चूक झाली आहे. तुम्हाला हवे ते द्यायला मी तयार आहे. पण माझ्यावर हल्ला करु नये.”यावर अश्शूरच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला अकरा टन चांदी आणि एक टन सोने अशी खंडणी मागितली.
योशीयाच्या कारकिर्दीत, मिसरचा राजा फारो-नखो याने फरात नदीजवळ अश्शूरच्या राजावर स्वारी केली. तेव्हा योशीया फारो-नखोवर चाल करुन गेला. पण मगिद्दो येथे फारो-नखोने त्याला पाहिले आणि ठार केले.
बाबेलच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले.
त्यानंतर मिसरचा नखो याने यहोआहाजला कैद केले. नखोने यहूदाच्या लोकांवर 3 3/4 टन चांदी आणि 75 पौंड सोने एवढा दंड बसवला.
जर एखाद्याला चटकन् राग येत असेल तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागते. जर तुम्ही त्याला त्याच्या संकटातून वाचवत राहिलात तर तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करील.
खास्द्यांच्या सैन्याने सिद्कीयाचा व त्याच्याबरोबर असलेल्या सैनिकांचा पाठलाग केला आणि यरिहोच्या मैदानात त्याना त्यांनी पकडले. त्यांनी सिद्कीयाला पकडून बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे नेले तेव्हा नबुखद्नेस्सर हमाथ प्रांतातील रिब्ला येथे होता. सिद्कीयाचे काय करायचे हे नबुखद्नेस्सरने ठरविले.
बाबेलच्या सैन्याने सिद्कीयाला पकडले मग त्यांनी त्यास रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. रिब्ला शहर हमाथ देशात आहे. बाबेलच्या राजाने, रिब्ला येथे, सिद्कीया राजाला शिक्षा ठोठावली.
सेनापती नबूजरदानने ह्या सर्व अधिकाऱ्यांना बाबेलच्या राजाकडे आणले बाबेलचा राजा तेव्हा रिब्ला शहरात होता. रिब्ला हमाथ देशात आहे. रिब्लामध्ये राजाने त्या सर्वांना ठार करण्याचा हुकूम दिला.अशा तऱ्हेने यहूदी लोकांना त्यांच्या देशातून नेले गेले.
त्यापैकी एक पिल्लू उठते त्याची वाढ होऊन तो शक्तिशाली तरुण सिंह झाला आहे. तो शिकार करायला शिकला आहे. त्याने माणसाला मारुन खाल्ले.
त्याने राजवाड्यांवर हल्ला केला, व शहरांचा नाश केला. त्या सिंहाची गर्जना ऐकताच, त्या देशातील प्रत्येक माणूस बोलायलासुध्दा घाबरत असे.
त्यांनी त्याला वेसण घालून पिंजऱ्यात कोंडले. त्यांनी त्या सिंहाला सापळ्यात अडकविले. मग त्यांनी त्याला बाबेलच्या राजाकडे नेले. आता, इस्राएलच्या डोंगरातून त्याची गर्जना तुम्हाला ऐकू येऊ शकत नाही.