Home Bibles 2 राजे 22:14 · मराठी बायबल
2 राजे 22:14 · मराठी बायबल

मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती बायको. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरुशलेममध्ये दुसऱ्या भागात राहात होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.”

Cross references

निर्गम 15:20

त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया गाऊ व नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;

शास्ते 4:4

तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती.

2 राजे 10:22

वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बालच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वासाठी वस्त्रे दिली.

2 इतिहास 34:22

हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची बायको. शल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा मुलगा. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरुशलेमच्या नवीन भागात राहात होती. हिल्कीया आणि राजाचे सेवकयांनी तिला सर्व हकीगत सांगितली.

नहेम्या 7:72

इतर सर्व लोकांनी मिळून 375पौंड सोने, 1 1/3 टन चांदी आणि याजकांसाठी 67वस्त्रे दिली.

मीखा 6:4

मी केलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुमच्याकडे पाठविले. मिसर देशातून मी तुम्हाला आणले. दास्यातून मी तुमची मुक्तता केली.

सफन्या 1:10

परमेश्वरा असेही म्हणाला त्या वेळेला, लोक यरुशलेमच्या मासळी दाराशी मदतीसाठी हाका मारीत असतील. गावाच्या इतर भागांत लोक रडत असतील. नगरीभोवतीच्या टेकड्यांवरुन लोकांना वस्तूंचा नाश होत असताना येथो, तसा मोठा धडधडाट ऐकू येईल.

लूक 1:41

आणि असे झाले की, जेव्हा अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटातील बालकाने उडी मारली. आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरुन गेली.

लूक 2:36

तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी स्त्री होती. ती फनूएलाची मुलगी होती. ती अशेर वंशाची होती. ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.

प्रेषितांचीं कृत्यें 21:9

त्याला चार मुली होत्या. त्यांची लग्रे झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी (भविष्याविषयीचे) सांगण्याचे दान होते.

1 करिंथकरांस 11:5

परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते. कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.

Interlinear

Choose Theme