Home Bibles ☰ Books 2 राजे 19:3 · मराठी बायबल
2 राजे 19:3 · मराठी बायबल

ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण आईला प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे.

Cross references

2 राजे 18:29

राजाचे म्हणणे आहे, ‘हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हाला वाचवू शकणार नाही.’

स्तोत्रसंहिता 39:11

परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस. त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतातआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्याढगासारखे आहे.

स्तोत्रसंहिता 95:8

देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.

स्तोत्रसंहिता 123:3

त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.

यशया 26:17

परमेश्वरा, आम्ही तुझ्याबरोबर नाही. प्रसूति वेदना होऊन रडणाऱ्या स्त्रीसारखे आम्ही आहोत. ती वेदनेने विव्हळते.

यशया 66:9

त्याचप्रमाणे मी सुध्दा नवीन निर्मिती होऊ न देता वेदना होऊ देणार नाही.”परमेश्वर पुढे म्हणतो, “जर मी तुम्हाला प्रसूतिवेदना दिल्या तर तुम्हाला नवीन राष्ट्र मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला वचन देतो.” तुमचा देव असे म्हणाला.

यिर्मया 30:5

परमेश्वर म्हणाला,“लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते. लोक घाबरले आहेत. कोठेही शांती नाही.

होशेय 5:15

लोक त्यांचा अपराध कबूल करेपर्यंत आणि माझा शोध घेईपर्यंत मी माझ्या जागी परत जाईन. हो! त्यांच्या अडचणीच्या वेळी ते माझी कसून शोध करतील.”

होशेय 13:13

त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल. तो सुज्ञ मुलगा नसेल त्याची जन्मवेळ येईल, तेव्हा तो वाचणार नाही.

इब्री लोकांस 3:15

पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:“आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा तुम्ही देवाविरुद्ध बंड केलेत; तशी आपली अंत:करणे कठीण करू नका.”स्तोत्र. 95:7-8

Interlinear

Choose Theme