Home Bibles 2 राजे 14:10 · मराठी बायबल
2 राजे 14:10 · मराठी बायबल

अदोमचा तू पराभव केलास हे खरे पण त्या विजयाने तू जन्मत्त झाला आहेस. पण आहेस तिथेच राहून बढाया मार. स्वत:ला संकटात लोटू नको. हे ऐकले नाहीस तर तुझा आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल.”

Cross references

निर्गम 8:9

मोशे फारोला म्हणाला, “हे बेडूक केव्हा दूर करावेत अशी तुमची इच्छा आहे ते मला सांगा. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करीन. मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील.”

अनुवाद 8:14

या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले.

शास्ते 9:52

अबीमलेख व त्याची माणसे हल्ला करायला गढीपर्यंत आली. त्यांना गढीला आग लावायची होती.

2 राजे 14:7

मिठाच्या खोऱ्यात अमस्याने दहाहजार अदोम्यांना मारले. या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “चकथेल” ठेवले अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.

2 इतिहास 26:16

पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.

2 इतिहास 32:25

पण हिज्कीयाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्याला धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिज्कीयावर आणि यहूदा व यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला.

2 इतिहास 35:21

पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्याला कळवले की, “राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.”

नीतिसूत्रे 3:30

योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका.

नीतिसूत्रे 15:18

लवकर रागावणारे लोक संकटे आणतात. पण संयमी माणूस शांतता आणतो.

नीतिसूत्रे 16:18

जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो.

नीतिसूत्रे 17:14

वादाला तोंड फोडणे हे धरणात भोक करण्यासारखे आहे. वाद मोठा होण्याच्या आतच तो बंद करा.

नीतिसूत्रे 20:3

कुठलाही मूर्ख वादविवादाला सुरुवात करु शकतो. म्हणून जो वादविवादाला नकार देतो त्याचा तुम्ही आदर करु शकता.

नीतिसूत्रे 25:8

तुम्ही काही बघितले असेल तर त्याबद्दल न्यायाधीशाला सांगण्याची घाई करु नका. तुम्ही चुकत आहात हे दुसऱ्याने सिध्द केले तर तुम्ही गोंधळून जाल.

नीतिसूत्रे 26:17

दोन माणसांच्या वादातला भाग बनणे हे फार धोकादायक असते. ते रसत्याने चालताना कुत्र्याला त्याचे कान धरुन पकडण्यासारखेच असते.

यिर्मया 9:23

परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल बढाई मारु नये.” असे परमेश्वर म्हणतो.

यहेज्केल 28:5

तुझ्या शहाणपणाने आणि व्यापारामुळे तुझी संपत्ती वाढली आणि आता तुला त्यांचाच गर्व झाला आहे.

यहेज्केल 38:2

“मानवपुत्रा, मागोगमधील गोगकडे बघ मेशेखचा व तुबालचा तो अती महत्वाचा नेता आहे. माझ्यावतीने गोगविरुद्ध बोल.

यहेज्केल 38:5

पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. 5पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. त्यांच्याजवळ ढाली असतील आणि त्यांनी शिरस्त्राणे घातलेली असतील.

यहेज्केल 38:17

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी, मी पूर्वी जे तुझ्याजवळ बोललो होतो, ते लोकांना आठवेल. मी माझ्या सेवकांचा, इस्राएलच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला हेही त्यांना आठवेल ‘मी तुला त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन असे इस्राएलच्या संदेष्ट्यांनी, माझ्यावतीने, पूर्वीच सांगितल्याचे त्यांना स्मरेल.”

दानीएल 5:20

पण नबुखद्नेस्सरला गर्व झाला, तो दुराग्रही बनला. म्हणून त्याची सत्ता काढून घेेतली गेली. त्याला सिंहासन सोडावे लागले, त्याच्या वैभवाचा लोप झाला.

दानीएल 11:12

उत्तरेच्या सैन्य़ाचा पराभव होईल व त्या सैनिकांना धरून नेतील दक्षिणेच्या राजाला गर्व होईल. तो उत्तरेचे हजारो सैनिक ठार करील.पण त्याचे येस फर काळ टिकणार नाहि

हबक्कूक 2:4

जे लोक हा संदेश ऐकण्याचे नाकारतील, त्यांना त्याचा फायदा होऊ शकणार नाही. पण सज्जन माणूस ह्या संदेशावर विश्वास ठेवील. आणि तो त्याच्या श्रध्देमुळे जगे”

लूक 14:31

ʇकिंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय?

याकोब 1:9

गरिबीत असलेल्या बंधूने, देवाने त्याला आध्यात्मिक संपत्ती दिलेली आहे याविषयी अभिमान बाळगावा.

याकोब 4:6

पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.”

Interlinear

Choose Theme