Home Bibles 2 राजे 13:7 · मराठी बायबल
2 राजे 13:7 · मराठी बायबल

अरामच्या राजाने यहोआहाजच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांना त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे यहोआहाजच्या सैनिकांची अवस्था होती.

Cross references

लेवीय 26:17

मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.

1 शमुवेल 13:6

आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ट्यांच्या कचाट्यांत सापडलो आहोत हे इस्राएलांच्या लक्षात आले. ते गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला.

1 शमुवेल 13:15

शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यामीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली.

1 शमुवेल 13:19

इस्राएलमध्ये लोहार नव्हते. त्यामुळे त्यांना लोखंडाच्या वस्तू करता येत नसत. पलिष्ट्यांनीही त्यांना ही विद्या शिकवली नाही कारण ते लोखंडी भाले, तलवारी करतील ही त्यांना धास्ती होती.

1 राजे 20:15

तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.

1 राजे 20:27

इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.

2 राजे 8:12

हजाएलने त्याला विचारले, “तुम्ही का रडत आहात?”अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहीत आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील.त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.”

2 राजे 10:32

याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.

स्तोत्रसंहिता 18:42

मी माझ्या शत्रूचे मारुन तुकडे केले. त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.

यशया 36:8

तुम्हाला अजूनही आमच्याशी लढायचे असेल तर माझा प्रभु, अश्शूरचा राजा, तुमच्याबरोबर एक करार करील. तो असा तुमच्याकडे दोन हजार घोड्यांवर स्वार होऊन लढण्यास पुरेसे घोडेस्वार असतील तर मी तुम्हाला दोन हजार घोडे देईन.

यशया 41:2

माझ्या पुढील प्रश्नांना उत्तरे द्या:पूर्वेकडून येणाऱ्या माणसाला कोणी उठविले? चांगलुपणा त्याच्याबरोबर आहे. तो त्याच्या तलवारीच्या जोरावर राष्ट्रांना पराभूत करतो मग त्यांची जणू माती होते. तो तीर सोडतो आणि राजांना जिंकतो. वाऱ्याने गवताची काठी उडावी तसे ते दूर पळतात.

यशया 41:15

“मी तुम्हाला कोऱ्या मळणीयंत्राप्रमाणे केले आहे. त्या यंत्राला खूप तीक्ष्ण दाते आहेत. शेतकरी त्याचा उपयोग टरफलांपासून धान्य वेगळे करण्याकरिता करतात. त्याचप्रमाणे तुम्ही डोंगर पायाखाली तुडवून चिरडून टाकाल. तुम्ही टेकडयांची अवस्था धान्याच्या भुसकटाप्रमाणे कराल.

योएल 3:14

निर्णयाच्यादरीत पुष्कळशी माणसे आहेत. परमेश्वराचा विशेष दिवस जवळ आला आहे.

आमोस 1:3

परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “दिमीष्कच्या लोकांनी पुष्कळ अपराध केल्यामुळे मी त्यांनी खात्रीने शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादला धान्य मळण्याच्या लोखंडी अवजाराने मारले.

आमोस 4:10

मिसरला मी पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली. तुमच्यावर पाठविली. तुमच्या तरुणांना मी तलवारीने मारले. मी तुमचे घोडे काढून घेतले. मी तुमच्या तळांवर प्रेतांची दुर्गंधी पसरविली. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर हे सर्व बोलला आहे.

Interlinear

Choose Theme