2 राजे 13:22 · मराठी बायबल
यहोआहाजच्या कारकिर्दीमध्ये अरामचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता.
Cross references
2 राजे 8:12
हजाएलने त्याला विचारले, “तुम्ही का रडत आहात?”अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहीत आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील.त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.”
2 राजे 13:3
मग परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेनहदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
स्तोत्रसंहिता 106:40
देव त्याच्या माणसांवर रागावला. देवाला त्यांचा कंटाळा आला.