राजा योवाश जिथे जिथे जाईल तिथे तिथे सर्ववेळ तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे. प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्याला मारुन टाकावे.”
Cross references
परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
परमेश्वरा, मी प्रार्थना करतो की तू या लोकांसाठीनेता निवडशील.”
हे सर्व यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घटृ धरुन बसला.
हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”
लेवींनी राजाच्या निकट राहायचे. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायाचा प्रयत्न केल्यास त्याला ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.”