योवाश आणि यहोशेबा मग परमेश्वराच्या मंदिरात लपून राहिले. योवाश तिथे सहा वर्षे राहिला. यहूदावर अथल्याचे राज्य होते.
Cross references
ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला; तो मुलगा फार सुंदर व देखणा आहे असे पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले.
अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगव्व्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.
परमेश्वराच्या मंदिरात त्याला याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने राणी म्हणून अंमल चालवला.
ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोट्या दागिन्याप्रमाणे आहेत. ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्तअसतात.
गर्विष्ठ लोक सुखी आहेत, असे आम्हाला वाटते. दुष्टांना यश मिळते. वाईट कृत्ये करुन ते देवाचा अंत पाहतात पण देव त्यांना शिक्षा करीत नाही.”