Home Bibles 2 राजे 10:7 · मराठी बायबल
2 राजे 10:7 · मराठी बायबल

या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या सर्वच्यासर्व सत्तर जणांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे पाठवल्या.

Cross references

शास्ते 9:5

अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगव्व्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.

1 राजे 21:19

अहाबला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.”

1 राजे 21:21

तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, ‘मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना ठार करीन.

2 राजे 10:9

सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्याला ठार केले. पण अहाबच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत.

2 राजे 11:1

अथल्या ही अहज्याची आई. आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर ती उठली आणि सर्व राजघरण्याची तिने हत्या केली.

2 इतिहास 21:4

यहोराम आपल्या वडीलांच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडीलधाऱ्यांचा तलवारीने वध केला.

मत्तय 14:8

तिच्या आईच्या सांगण्यावरन ती म्हणाली, “मला तेथे तबकात बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर द्या.”

Interlinear

Choose Theme