यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यात आला. तसेच अर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.
Cross references
तेव्हा मोशेने ती जमीन गादच्या, रऊबेनच्या लोकांना आणि मनश्शेच्या कुटुंबातील अर्ध्या लोकांना दिली. (मनश्शे योसेफचा मुलगा होता.) त्या प्रदेशात अमोऱ्याचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्या राज्याचा त्या भूमीत समावेश होता. त्यांत आजुबाजूच्या प्रदेशातील शहरे होती.
आर्णेन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एकनगर तसेच आर्णेन खोरे ते गिलाद या टापूतील सर्व नगरे, परमेश्वर आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही जिंकून घेतली. आम्हाला दुर्गम असे एकही नगर नव्हते.
“तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असा - आर्णोन खोऱ्यातल अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे.
गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.”(बाशान म्हणजे ओगचे राज्य. त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात. ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात.
आर्णीन खोऱ्या नजीकच्या अरोएर पासून त्यांचा प्रदेश सुरु होतो. तो खोऱ्याच्या मध्यावरील गावापर्यंत मेदबापासून दिबोनपर्यंतचे सलग पठार त्यात मोडते.
परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “दिमीष्कच्या लोकांनी पुष्कळ अपराध केल्यामुळे मी त्यांनी खात्रीने शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादला धान्य मळण्याच्या लोखंडी अवजाराने मारले.