आणि त्याच्या आज्ञेत राहणे म्हणजेच प्रीति करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही सुरुवातीपासूनऐकली आहे: की तुम्ही प्रीतीचे जीवन जगावे.
Cross references
“जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल.
ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वत:ला त्याच्यासाठी प्रगट करीन.”
ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.
मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात.
एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे.
परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एकसबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करु नका. त्याऐवजी प्रीतिमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा).
पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्णझाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की, आम्ही देवामध्ये आहोत.
तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, त्यामध्येच राहा, सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्हीराहाल, तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल.
देवाप्रती असलेली आमची प्रीति आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवूशकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत.
आणि आम्हांला हे माहीत आहे की जर तो आमचे ऐकतो,तर कोणत्याही कारणासाठी जरी आम्ही प्रार्थना केली, तर आम्हांस माहीत आहे की, जे काही आम्ही मागितले आहे तेआम्हांला मिळालेच आहे.
आणि आता, बाई, कुरिया, मी तुला नम्रपणे विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीति करावी. मी ही तुला नवीआज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून तुलादेण्यात आलेली होती,