Home Bibles 2 करिंथकरांस 3:16 · मराठी बायबल
2 करिंथकरांस 3:16 · मराठी बायबल

पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते.

Cross references

निर्गम 34:34

जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्या समोर जाई, तेव्हा तो आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे येऊन परमेश्वराने दिलेल्या आज्ञा त्यांना सांगत असे.

अनुवाद 4:30

या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्या कडेच परतून याल व त्याला शरण जाल.

अनुवाद 30:10

पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंत:करणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल.

यशया 25:7

सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच “मृत्यू” होय.

यशया 29:18

बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल आणि आंधळ अंधारातून आणि धुक्यातून पाहू शकेल.

यशया 54:13

तुझी मुले देवाला अनुसरतील. आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल.

यिर्मया 31:34

लोकांना, त्यांच्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना परमेश्वराची ओळख करुन द्यावी लागणार नाही. का? कारण सर्वजण, लहानापासून थोरापर्यंत राजापासून रंकापर्यंत, मला ओळखत असतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन. मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”

विलापगीत 3:40

आपण आपली कर्मे पाहू या आणि तपासू या व नंतर परमेश्वराकडे परत जाऊ या.

होशेय 3:4

ह्याचप्रमाणे, पुष्कळ दिवस इस्राएली लोकांना राजावाचून वा नेत्यावाचून काळ कंठावा लागेल. त्यांना बळी, स्मृतिशिळा, एफोद वा घराण्याचा देव यांच्यावाचून राहावे लागेल.

योहान 6:45

संदेष्टयांनी असे लिहिले आहे की, ‘देव सर्व लोकांना शिक्षण देईल.’लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात, तेच लोक माझ्याकडे वळतात.

रोमकरांस 11:23

आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे.

रोमकरांस 11:25

परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशत: कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.

Interlinear

Choose Theme