जरी मी ख्रिस्ताचा अभिमान बाळगण्याचे निवडले. तरी मी मूर्ख असणार नाही. कारण मी सत्य बोलत असेन पण मी स्वत:ला आवरतो. यासाठी की कोणी माझ्या मागे जे काही पाहतो किंवा माइयापासून जे काही ऐकतो त्यापेक्षा कोणीही मला अधिक मानू नये.
Cross references
“या गोष्टी खऱ्या आहेत हे मी शपर्थपूर्वक सांगतो. मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल? मी चुकलो हे कोण दाखवेल?”
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी साक्ष देतो
तर मग अपुल्लोस कोण आणि पौल कोण? आम्ही केवळ सेवक आहोत, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वासणारे झाला आणि आम्हा प्रत्येकाला देवाने जे काम नेमून दिले ते काम आम्ही केले.
कारण देवा समवेत आपण सर्वजण कामगार आहोत.तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
पण देव खात्रीने विश्वासपात्र आहे, म्हणून तुम्हांजवळ आम्ही तुम्हांला होय किंवा नाही म्हणून असे वचन दिलेले नाही, असे नाही.
जरी आम्ही वेडे असलो तरी ते ख्रिस्तासाठी, जर आम्ही आमच्या योग्य मन:स्थितीत असलो तर ते तुमच्यासाठी.
आणि जो आमचा अधिकार प्रभुने आम्हांस खाली पाडण्यास नव्हे, तर तुमच्या वाढीसाठी दिला आहे त्याविषयी जरी काही विशेष अभिमान बाळगला, तरी मी लज्जित होणार नाही.
मी पुन्हा म्हणतो: कोणीही मला मूर्ख समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन.
देव आणि प्रभु येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुति केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही.
आणि माझ्या प्रकटीकरणाच्या अतिशय मोठेपणामुळे मी खूप जास्त चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात रुतणारा काटा, (सैतानाचा दूत) मला ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आला.
मी स्वत:च मूर्ख झालो पण तसे होण्यास तुम्ही मला भाग पाडले तुमच्याकडून माझी प्रशंसा व्हावयाची होती. जरी मी काही नसलो तरी अतिश्रष्ठ प्रेषितांपेक्षा मी कमी नव्हतो.