Home Bibles 2 इतिहास 9:20 · मराठी बायबल
2 इतिहास 9:20 · मराठी बायबल

राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती. लबानोनच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुध्द सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.

Cross references

1 राजे 10:21

शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमधली सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्व सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.

2 इतिहास 9:27

राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरुची झाडे, डोंगराळ देशातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती.

एस्तेर 1:7

सुवर्णपात्रांतून द्राक्षारस दिला होता. ही पात्रेही नानाविविध तऱ्हांची होती. राजा अतिशय उदार असल्यामुळे द्राक्षारस भरभरुन देण्यात आला.

यशया 2:22

जर तुम्हाला स्वत:चे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत म्हणजेच मर्त्य आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका.

यिर्मया 31:5

इस्राएलमधील शेतकऱ्यांनो, तुम्ही पुन्हा द्राक्षाच्या बागा लावाल. शोमरोन शहराच्या भोवतालच्या टेकडीवर तुम्ही द्राक्षवेलींची लागवड कराल. त्या द्राक्षमळ्यातील पिकांचा तुम्ही आस्वाद घ्याल.

दानीएल 5:2

राजाने मद्य पिता-पिता आपल्या सेवड्ढांना सोन्या चांदीचे प्याले आणण्याचा हुकूम दिला. हे प्याले, त्याचे आजोबा नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणले होते. राजघराण्यातील लोकांनी राजाच्या स्त्रियांनी आणि दासींनी त्या प्याल्यांतून मद्य प्यावे अशी राजाची इच्छा होती.

Interlinear

Choose Theme