हिरामने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात दरबेज अशा हिरामच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर हे सेवक ओफिर येथे गेले आणि तेथून 17 टन सोने आणून त्यांनी ते शलमोनाला दिले.
Cross references
समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाशयांबरोबर पाठवले.
राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत.
हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफि?रहूून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली.
शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन 25 टन एवढे असे.
तार्शीश येथे जाणारी गलबते त्याच्याकडे होती. हिरामची माणसे त्याच्या गलबतांतून मालाची ने - आण करीत. सोन - रुपे, हस्तिदंत, वानरे आणि मोर यांनी भरलेली ही गलबते दर तीन वर्षानी तार्शीशहून शलमोनाकडे येत.
मी स्वत:साठी सोने आणि चांदी गोळा केली. मी राजांकडून, त्याच्या देशांकडून संपत्ती घेतली. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते. कोणालाही हव्याहव्याशा वाटणाऱ्य गोष्टी माझ्याजवळ होत्या.