Home Bibles 2 इतिहास 8:12 · मराठी बायबल
2 इतिहास 8:12 · मराठी बायबल

मग शलमोनाने वेदीवर परमेश्वराला होमार्पणे वाहिली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.

Cross references

1 इतिहास 28:17

काटे, कटोरे, सुरया यांना लागणारे निर्भेळ सोने, तबकांसाठी लागणारे सोने-चांदी यांचे वजन दिले.

2 इतिहास 1:6

परमेश्वराच्या निवासमंडपासमोरील पितळी वेदी वर शलमोनाने 1,000 होमार्पणे केली.

2 इतिहास 4:1

शलमोनाने वेदी पितळेची केली. ती 30 फूटलांब, 30 फूट रुंद आणि 81 फूट उंच होती.

2 इतिहास 15:8

आसाला या शब्दांनी आणि ओबेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मर्तिही काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.

यहेज्केल 8:16

मग त्याने मला परमेश्वराच्या मंदिरातील आतल्या अंगणात नेले. तेथे पंचवीसजण नतमस्तक होऊन पूजा करीत होते. ते द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये होते. पण त्यांची तोंडे चुकीच्या दिशेला होती. पवित्रस्थळाकडे त्यांच्या पाठी होत्या. ते नतमस्तक होऊन सूर्याची पूजा करीत होते.

यहेज्केल 45:17

पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.”

योएल 2:17

याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. ह्या सर्व लोकांनी म्हणावे, “परमेश्वरा, तुझ्या माणसांवर दया कर. तुझ्या माणसांची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. तुझी माणसे दुसऱ्या लोकांनी आम्हाला हसू नये वक्ष “कोठे आहे तुमचा परमेश्वर?” असे विचारू नये.

योहान 10:23

येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीतत होता.

Interlinear

Choose Theme